सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
जगन्नाथ महाराज मंदीर (राष्ट्रीय विद्यालय मारेगाव) येथील भव्य पटांगणात होणाऱ्या या रक्तदान शिबिरास साई मित्र परिवार, मारेगाव च्या वतीने आयोजित करण्यात आले. जिल्ह्यात रक्त पिशव्याची गरज आहे. परंतु त्यामानाने रक्त पुरवठा पाहिजे तसा होत नसल्याने आज, रविवारी संपन्न झालेल्या शिबिरात एकशे सहा रक्त पिशव्या गोळा झाल्या आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंग्यू रुग्णांकरिता रक्ताची मोठी आवश्यकता असते. परिणामी दरवर्षी रक्तदान शिबीर सामाजिक उपक्रम राबविण्यात येते.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान असं म्हटलं जात त्या अनुषंगाने साई मित्र परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव २०२३ आयोजित दोन दिवशीय हा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, त्यात मुख्यता 'भव्य रक्तदान शिबीर' उपक्रम राबविण्यात येतो या वर्षी सुद्धा या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान केले, अशी माहिती साई मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली.
सोबतच आज सायंकाळी ७ वाजता सोपानदादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. या होणाऱ्या व्याख्यानाला तालुक्यातील जनतेनी हजर राहून लाभ घ्यावा. तसेच उद्या 3 जुलै ला महाप्रसाद (३ ते ५ पर्यंत) व भव्य शोभायात्रा (५ वा.) चे सायंकाळ'ला आयोजन केले आहे, यात्रेत शहरातील भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन साई मित्र परिवार, मारेगाव च्या वतीने करण्यात येत आहे.
मारेगाव येथील रक्तदान शिबीर संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 02, 2023
Rating:
