यंदाही साई मित्र परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिर व जाहीर व्याख्यानचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सतत 13 वर्षांपासून रक्तदान शिबीर घेवून अनेक गरीब गरजवंत लोकांना जीवनदान दिले आहे, तेच कार्य अविरत सुरु असून याही वर्षीही गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त (2023) भव्य रक्तदान शिबीर रविवार दि.2 जुलै ला सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत येथील महामार्गवरील जगन्नाथ महाराज मंदिर, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे संपन्न होणार आहे.
या शिबिरात वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांच्या सौजन्याने पार पडणार असून सायंकाळी 7. वाजता सोपानदादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. सोमवार दि. 3 जुलै ला दुपारी 3 ते सायं.5 वाजता महा प्रसादाचा लाभ घेता येईल त्यानंतर पाच वाजता भव्य शोभा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या भव्य रक्तदान शिबिरास, जाहीर व्याख्यान, महाप्रसाद व शोभा रात्रेत तालुक्यातील जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान, महाप्रसाद व शोभा यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन साई मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.
यंदाही साई मित्र परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिर व जाहीर व्याख्यानचे आयोजन यंदाही साई मित्र परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिर व जाहीर व्याख्यानचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 27, 2023 Rating: 5
Powered by Blogger.