सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : कोतवाल हा तहसीलचा कणा आहे. त्यांच्याशिवाय अनेक कामे अपूर्ण आहे. पद कोणतेही असले तरी ते लहान नसते. त्या पदाला न्याय देण्याचे काम खऱ्या अर्थाने तुम्ही कोतवाल लोक करीत आहात असे प्रतिपादन तहसीलदार यु एस निलावाड यांनी केले. ते कोतवाल संघटनेतर्फे (ता.२५ जून) नवरगांव येथील स्नेहभोज कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त तलाठी रामदास वरारकर, कनिष्ठ लिपिक गजानन ढेंगळे, तुळसामाता देवस्थान नवरगांवचे सचिव विलास नक्षीणे, कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना निलावाड म्हणाले की, तहसील कार्यालयामध्ये अशी अनेक कामे आहेत जी कोतवाल सक्षमपणे करू शकतात. व्यक्ती हा पदाने लहान किंवा मोठा होत नसतो तर, कार्य करण्याची उर्मी आणि कार्यनिष्ठा ही त्या व्यक्तीला महान बनवत असते. काही ठिकाणी रेतीच्या अवैध वाहतुकीवर आम्ही धाडी टाकल्या त्यावेळीही आम्हाला कोतवाल बांधवांचे मोठे सहकार्य लाभले. कदाचित त्यांच्याविना ही प्रक्रिया अधुरी राहिली असती असेही तहसीलदार निलावाड म्हणाले.
कोतवाल हा तहसीलचा कणा आहे: तहसीलदार उत्तम निलावाड यांचे प्रतिपादन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 26, 2023
Rating:
