सिंधी येथील नागरिकांची ओरड, प्रभागातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : रविवार च्या मध्यरात्री पासून पावसाची रिपरिप सुरु झाली. काल सोमवारला दुपारी झालेल्या पावसाने तालुक्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली, त्या पावसाने  घाण वाहून गेली, मात्र काही गावातील पायदळी चालणाऱ्याची डोकेदुखी वाढवल्याचे चित्र आहे.

सिंधी (महागांव) येथील प्रभाग 1 मध्ये, नळ योजनेच्या कामासाठी गावातील चांगल्या रस्त्यांचे खड्ड्यात रूपांतरण झाल्याचे नागरिकांतून ओरड आहे. त्यावर कोणत्याही पद्धतीचे पुनर्भरणा करण्यात आला नसल्याने अधून मधून सुरु असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलाचा नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे.

प्रशासन, ठेकेदार, की ग्रामपंचायत पदाधिकारी याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर पावसाचे घाण पाणी साचून रस्त्याची चाळण झाली असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळतेय. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. याकडे ग्रामपंचायत पदाधिकारीचे दुर्लक्ष होत असल्याचे तक्रारी समोर येत असून या मार्गांवरून येणाऱ्या जाणाऱ्यांकडून संताप व्यक्त आहे.

दोन दिवसापासून वरून राजाचे आगमन झाले असून हवामान अंदाज मुसळधार पाऊस बरसणार असे संकेत असतांना तातडीने या समस्याकडे ग्रामपंचायतने लक्ष देऊन ग्रामस्थांना होणारा नाहक त्रास कायमचा सोडवावा अशी मागणी सह अपेक्षा आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. सुरु असलेले काम पुर्ण झाल्याशिवाय सदर रस्ता पूर्ववत करता येणार नाही, मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या मुरूम टाकून दिल्या जाईल.

-अविनाश लांबट
उपसरपंच तथा कृ. बा. स मारेगाव 
सिंधी येथील नागरिकांची ओरड, प्रभागातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य सिंधी येथील नागरिकांची ओरड, प्रभागातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य Reviewed by सह्याद्री चौफेर on June 27, 2023 Rating: 5
Powered by Blogger.