पैकूजी आत्राम यांना 'आदिवासी समाजभुषण पूरस्कार' प्रदान


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पैकूजी आत्राम हे आदिवासींच्या सामाजिक,कला व साहित्य क्षेत्रात नेहमी उल्लेखनिय कार्य करीत असतात.ते कोलामी भाषीक विध्यार्थ्यांच्या प्रगती साठी कोलामी भाषेतून विविध शैक्षणिक साधने,उपक्रम व लेखन करीत असतात.त्यांनी कोलामी भाषीक विध्यार्थ्यासाठी कोलामी-मराठी द्विभाषीक पुस्तकांची निर्मीती करून यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी शाळेत वितरीत केलेले आहे.ते कोलामी भाषीक मुलांसासाठी नवनवीन उपक्रम राबवित असतात.नुकतेच त्यांच्या एका उपक्रमाला 'National Level Teacher Innovation Award' मिळालेला आहे.ते आदिम कोलामी भाषेच्या संशोधनासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे येथे कोलामी-मराठी शब्दकोश दिलेला आहे.

जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळेतील बहूल कोलामी भाषीक विध्यार्थ्यांच्या शाळेतील अनेक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.तसेच कोलामी भाषेतील बोधप्रद व प्रेरणादायी गीतांची रचना करून आदिवासी प्रबोधन कार्यक्रमात सादर केलेली आहे.या बाबींचा विचार करून वणी येथे दिनांक २४ जून २०२३ ला दुसरे नवोदित आदिवासी साहित्य परीषदेत त्यांचा 'आदिवासी समाज भुषण पुरस्कार' साहित्य परिषदेच्या अध्यक्षा साहित्यीक व विचारवंत आ.कुसूम अलाम यांच्या हस्ते पैकूजी आत्राम यांना प्रदान करण्यात आला.या प्रसंगी श्री.प्रभु राजगडकर,सौ.उषाकिरण आत्राम, श्री.दशरत मडावी,श्री.वसंत कनाके व सौ.शितल ढगे इत्यादी साहित्यीक व विचारवंत उपस्थित होते.
पैकूजी आत्राम यांना 'आदिवासी समाजभुषण पूरस्कार' प्रदान पैकूजी आत्राम यांना 'आदिवासी समाजभुषण पूरस्कार' प्रदान Reviewed by सह्याद्री चौफेर on June 27, 2023 Rating: 5
Powered by Blogger.