सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
अल्पवाधित लोकप्रियता मिळवलेले प्रदीप शिरस्कर यांची जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले पो. नि अजित जाधव यांनी सोमवार 26 जून रोजी वणी ठाणेदार पदाचे सूत्र स्वीकारले.
अजित जाधव यांनी उपविभागातील मुकुटबन येथे योग्यरित्या काम सांभाळले. तसेच त्यांना परिसराची चांगलीच जाण आहे. त्यामुळे वणी ठाणे सांभाळताना त्यांना अडचण जाणार नाही. मात्र, अवैध धंदे फोफावणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. मटका जुगार, भंगार चोरी, गोवंश तस्करी, सुगंधी तंबाखूची होणारी आयात याचे समूळ उच्चाटन करण्याचे तगडे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
अजित जाधव यांच्याकडे वणी पोलीस स्टेशनचे सूत्र
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 27, 2023
Rating:
