मारेगाव : सरपंच उपसरपंचांनी दिलेला शब्द पाळला पाहिजेत अशी अपेक्षा होती, ती अपेक्षा मार्गी लागली. त्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले" - ही म्हण ज्या काळातील आहे तेव्हा बहुतेक खूपच सकारात्मक विचार असावेत कारण "जे बोलला आहे त्या प्रमाणे त्याने करून दाखवले तर त्याचे कौतुक करावे” असेच कार्य सिंधी येथील उपसरपंच यांनी प्रभातील नागरिकांची गांभीर्याने दखल घेऊन ते करून दाखवले आहे.
सिंधी महागांव गट ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होऊ घातलेल्या पावसाने निर्माण झाले होते. जनतेचे प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी सरपंच उपसरपंच सदैव तत्पर असून यांच्या विशेष प्रयत्नातून आज मंगळवारी मुरूम टाकून येथील नागरिकांची गैरसोयीना दिलासा मिळाला.गावातील वार्ड क्र. 2 मध्ये जलमिशन अंतर्गत योजनेचे काही कामे सुरु असल्यामुळे, नुकताच पावसाने येथील नागरिकांची गैरसोय निर्माण झाली व त्यांच्या या समस्यांचे निराकरण करण्यात उपसरपंच तथा संचालक अविनाश लांबट यांच्या प्रयत्नाने सिंधी येथील शाळेपासून ते हनुमान मंदिर पर्यंत रस्त्यावर मुरूम टाकून अडचण दूर करण्यात आले.
काम सुरू असतांना चांगल्या कामात अडचणी आणणाऱ्या काही विघ्नसंतोषीनी अडचणी आणण्याचं काम करू पाहतेय. परंतु यावर मात करीत सिंधी-महागांव च्या नागरिकांना दिलेला शब्द पाळला केला याचे समाधान आहे.
गावाच्या विकासासाठी साथ द्या
माझ्यावर विश्वास दाखवून गावातील विविध प्रश्नाबरोबरच सिंधी महागांवच्या विकासासाठी आमचे सर्व पदाधिकारी सदैव प्रयत्न करत आहोत, आपल्या सर्वांच्या सहकार्याने जनहितार्थ प्रश्न मार्गी लावता येईल. गावंच्या विकासाचे अजूनही प्रश्न बाकी आहेत. महागांव गट ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत अव्वल करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपसरपंच तथा संचालक अविनाश भाऊ लांबट यांनी केले.
शब्द पाळला : सिंधी महागांव येथील उपसरपंचांनी दखल घेऊन त्या रस्त्याची लावली विल्हेवाट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 27, 2023
Rating:
