आदिवासी साहित्य हे जगातील सर्वहारा माणसाच दुःख अधोरेखित करणारं साहित्य आहे - गीत घोष

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आदिवासी साहित्य हे जगातील सर्वहारा माणसाच दुःख अधोरेखित करणारं साहित्य असून ते शोषित, पिढीत, आदिम मानवाचा हुंकार आणि त्याच्या स्वातंत्र्याचा प्रकाश आहे. असे मत दुसरे नवोदित साहित्य परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्रगतशील साहित्यिक व विचारवंत मा.गीत घोष यांनी मांडले ते विरांगना राणी दुर्गावती स्मृती पर्व निमित्ताने आयोजित दुसरी नवोदित आदिवासी साहित्य परिषदेमध्ये उद्घाटन सोहळ्यात मार्गदर्शक म्हणून आपले विचार मांडताना बोलत होते.

वसंत को.शेतकरी जिनिंग हॉलमध्ये झालेल्या या परिषदेच्या अध्यक्ष आदिवासी साहित्यिक कवि कुसूमताई अलाम, गडचिरोली ह्या होत्या, उद्घाटन आदिवासी साहित्यिक मा.प्रभू राजगडकर नागपूर यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून आदिवासी साहित्यिक तथा संपादक गोंडवाना दर्शन, गडचिरोली, मा.दशरथ मडावी,आदिवासी साहित्यिक, यवतमाळ, मा.गीत घोष प्रगतशील साहित्यिक व विचारवंत, वणी, मा.निळकंठराव जुमनाके गुरुजी सं बिरसा मुंडा आ.पत.सं,यवतमाळ, मा.अशोकभाऊ नागभिडकर, संचालक वं.को.शेतकरी जि.प्रे.,वणी विनोद वाडेकर, मुंबई हे होते, विशेष अतिथी म्हणून मा.बि.डी. आडे, मा.ल.सू.राजगडकर, मा. एम.के.कोडापे,मा.पैकूजी आत्राम, डॉ. अरविंद कुळमेथे, डॉ. श्रीकृष्ण मडावी, मा.सुधाकर चांदेकर, मा.रमेश मडावी, मा.संतोष चांदेकर हे होते.

पुढे बोलतांना गीत घोष म्हणाले, साहित्य माणसाच्या समजेवर संस्कार करुन त्याच्या दृष्कोनात परिवर्तन घडवून आणत असते त्यामुळे साहित्य हे मानवी जाणीवाच प्रस्थापित व्यवस्थेशी झलेल हे एकप्रकारे युद्धच आहे. या परिषदेत आदिवासी स्त्री काल,आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद ठेवण्यात आला होता.अध्यक्ष मा.प्रब्रम्हानंद मडावी, मुल,हे होते,विषयाचे वक्ते,मा.प्रा. शीतल ढगे, सुवर्णा वरखडे,या होत्या, परिसंवादाचे प्रास्ताविक छायाताई उईके यांनी केले, सूत्रसंचालन आशाताई कोवे (गेडाम) यांनी केले तर आभार रिनाताई आदे यांनी मानले.याच बरोबर कविसंमेलन देखील घेण्यात आले. कविसंमेलनाच्या अध्यक्ष मा.रजनीताई पोयाम ह्या होत्या, निवेदन विनोद आदे यांनी केले तर आभार दत्ताजी गावंडे यांनी मानले, या परिषदेचे बिज भाषण मा.माजी गटविकास अधिकारी, वणी यांनी केले.

प्रास्ताविक मा.वसंत कनाके सर मुख्य आयोजक न.आ.सा.परिषद यांनी केले, संचालन मा.रामचंद्र आत्राम, यांनी केले तर आभार मा.धनराज मेश्राम यांनी मानले.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी अड.अरविंद सिडाम, दत्ताजी गावंडे, भगवान कुळमेथे, बेबिताई मेश्राम, आशाताई कोवे (गेडाम), रजनीताई पोयाम, मायाताई मरस्कोले, महेश आत्राम, शालिक कनाके, विनोद आले, लक्ष्मीताई धुर्वे, यांनी अथक परिश्रम घेतले.
आदिवासी साहित्य हे जगातील सर्वहारा माणसाच दुःख अधोरेखित करणारं साहित्य आहे - गीत घोष आदिवासी साहित्य हे जगातील सर्वहारा माणसाच दुःख अधोरेखित करणारं साहित्य आहे - गीत घोष Reviewed by सह्याद्री चौफेर on June 27, 2023 Rating: 5
Powered by Blogger.