ब्रेकिंग न्यूज : पुतण्याने केला चुलत्याचा कोयत्याने "गेम"

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोसारा येथे एका इसमाचा निर्घृन खून करण्यात आला. सदर घटना दि.30 जून रोजी सकाळी दहा वाजताचे दरम्यान, घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाला असून, तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सुभाष संभाजी पचारे (48) असे मृतकाचे नाव आहे. तर आरोपी चंपत देविदास पचारे (30) दोघेही कोसारा येथील रहिवाशी आहे. आज सकाळी चुलता आणि पुतण्याने मिळून दारू ढोसली, त्यातून "तू तू मैं मैं" झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून आरोपी चंपत याने आधी चुलत्याच्या छाताडावर दगड आदळला, नंतर कोयत्याने वार केला,मग त्याच्या देहात लाठी गुसवली ही समाजमन सुन्न करणारी घटना गुरुपौर्णिमेच्या पर्वावर आज शुक्रवारी सकाळी 10.15 वाजताचे दरम्यान, घडली. दारू ढोसलेल्या पुतण्याने अशी चुलत्याची निर्दयी निघृन हत्या केली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून वृत्त लिहेपर्यंत मृतदेहाचा पंचनामा सुरु असल्याचे माहिती आहे. तूर्तास या प्रकरणाची नेमकी कहाणी काय? हे आरोपीच सांगू शकणार...
अधिक तपास पोलीस करित आहे.

आज मारेगाव पोलीस स्टेशन मधून पुरी यांची बदली झाली आणि मारेगाव ठाण्याचे सूत्र जनार्दन खंडेराव यांचे कडे सोपण्यात आले, नवे ठाणेदार रुजी होणार मात्र,त्यांना सलामीसह खुणाची बोयणी झाली, असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. 
ब्रेकिंग न्यूज : पुतण्याने केला चुलत्याचा कोयत्याने "गेम" ब्रेकिंग न्यूज : पुतण्याने केला चुलत्याचा कोयत्याने "गेम" Reviewed by सह्याद्री चौफेर on June 30, 2023 Rating: 5
Powered by Blogger.