सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
म्हणून जनार्दन खंडेराव हे रुजू होणार आहेत,अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी जनार्दन एकनाथ खंडेराव यांच्याकडे मारेगाव पोलीस स्टेशनचे सूत्र सोपविले आहे.
ठाणेदार पुरी यांची वणी येथे बदली झाल्याने पो. स्टे.यवतमाळ यवतमाळ शहर असलेले स.पो.नि जनार्दन खंडेराव यांनी शुक्रवार (दि.30) जून रोजी मारेगाव ठाणेदार पदाचे सूत्र आज स्वीकारणार असल्याचे माहिती आहे.
जनार्दन खंडेराव यांनी यवतमाळ शहराचे ठाणे योग्यरित्या काम सांभाळले. तसेच यवतमाळ शहराचा चांगला अनुभव, त्यामुळे मारेगाव ठाणे सांभाळताना त्यांना फारशी अडचण जाणार नाही. मात्र, अवैध धंदे फोफावणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे.
तालुक्यातील कोंबडबाजार मटका जुगार, भंगार चोरी, गोवंश तस्करी, सुगंधी तंबाखूची होणारी आयात याचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.
जनार्दन एकनाथ खंडेराव यांचेकडे मारेगाव ठाण्याचे सूत्र
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 30, 2023
Rating:
