शिवणाळा येथील युवक अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत यवतमाळ महामार्गांवर भरधाव अज्ञात वाहनाने पायदळी चालणाऱ्या एका होतकरू तरुणाला धडक दिली. या दुर्घटनेत तरुण जागीच ठार झाला असून ही घटना काही मिनिटाअगोदर घडल्याचे समजते.
अनिल कृष्णराव टेकाम (26) रा. शिवणाळा असे या भीषण अपघातात ठार झालेल्या होतकरू युवकाचे नाव आहे. मृतक हा  नेहमी प्रमाणे मिस्त्री काम आटोपून पायदळ गावंच्या दिशेने येत असताना अज्ञात वाहनाने त्यास उडवून पोबारा केला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी 10.15 वाजता चे दरम्यान, यवतमाळ-मारेगाव महामार्गांवरील शिवणाळा फाट्यावर नजीक घडली.

अपघात इतका भीषण होता की, यात मृतकाचे डोके चेंदामेंदा झाल्याचे जमावांनी सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरु असल्याचे समजते.
अनिल याचे पश्चात एकटी आई असून त्याचे वडिलांचे मागच्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले अशी माहिती आहे. जन्मदात्रीचा आधार निघून गेल्याने शिवणाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहे. 
शिवणाळा येथील युवक अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार  शिवणाळा येथील युवक अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार Reviewed by सह्याद्री चौफेर on June 30, 2023 Rating: 5
Powered by Blogger.