सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : निसर्गाचा लहरीपणामुळे यंदाच्या मृग नक्षत्राने सलामी कोरडी दिली. त्यामुळे मारेगाव तालुक्यात मिरगाच्या मुहूर्तावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले होते.परिणामी पुढं तरी पावसाची हजेरी लाभेल या आशेत आकाशाकडे नजर लावून मागील काही दिवसात वाट पाहत असतानाच मागील तीन चार दिवसापासून अधून मधून पावसाच्या सरी पडत आहे.
मात्र शेतकऱ्यांना तालुक्यातील चारही महसूल जोरदार पावसाची प्रतीक्षा असून या हंगामात अद्याप तरी असा पाऊस झालेला नाही. मारेगाव तालुक्यातील शेतकरी शेतीच्या कामांना खरं तर एप्रिल महिन्याच्या अखेरपासूनच सुरुवात करतो. पावसाळी शेती पूर्वीची मशागतीची कामे तेव्हापासूनच सुरु होतात. मे च्या अखेरीस रोहणी नक्षत्राने मान्सूनपूर्व ढगांची झलक दाखवील्यावर शेतकरी पावसाची आस आणि हंगामातील रास मणी धरून पुढे कोणते नक्षत्र आहे. त्याचे वाहन काय? हे कधी संपते यांचा ताळमेळ मनात घोळत असतो.
त्याला कारणही तसेच आहे.शेतकऱ्यांचा जेवढा हवामान खात्यावर विश्वास नाही तेवढा विश्वास पंचांग, नक्षत्र व त्याची वाहने आणि जाणत्यांच्या दाखल्यावर आहे. नक्षत्राच्या वाहणावरून पावसाचा अंदाज भारतीय पंचांगानुसार नक्षत्राचे वाहने हत्ती,म्हैस, बेडूक असल्यास दमदार पाऊस, गाढव,उंदीर असल्यास मध्यम तर घोडा व कोल्हा असल्यास विरळ पाऊस होतो असा अंदाज बांधला जातो. परंतु जागतिक प्रदुर्षणामुळे पृथ्वीचे निसर्गचक्र
पूर्णतः बदलले आहे. यावर्षी आग ओकणाऱ्या मे महिन्यात बेमोसमी पावसाने चांगलेच धुवून काढले तर पाण्याचा अंदाज बांधून असलेल्या मृग नक्षत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे पंचांग नक्षत्राचा अंदाज हुकला एवढेच काय तर हवामान अभ्यासकाचे सुद्धा अंदाज चक्रीवादळाच्या अचानक आगमनामुळे चुकले.
मारेगाव तालुक्यातील चार ही महसूल मंडळात पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी आटोपल्या,मिरुग,कोरडा असतांना सुद्धा पेरणीचे दिवस वाया जात असल्याचे पाहून कोरडवाहू शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने धुरळपेरण्या केल्या. सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण परंतु जोरदार पाऊस काही पडला गेलाय, त्यात थोड्याफार प्रमाणात पडत असलेल्या हलक्या पावसामुळे धुरळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा जरी मिळाला असला तरी अपेक्षेप्रमाणे जोरदार पाऊस पडत नसल्याने अजून मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 01, 2023
Rating:
