होर्डिंगवरच्या वृक्षारोपणातून उदिष्ट साध्य होईल का?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक असताना मात्र,अनेक कार्यलया कडून प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्याऐवजी केवळ होर्डिंगवरच वृक्षारोपण करून कार्यक्रमाची अमलाबजावणी करण्यात आल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे अशा पोष्टर बाजीतून पर्यावरणाचा समतोल राखता येईल का? असा प्रश्न पर्यावरण प्रेमी मधून व्यक्त होत आहे.

शासनाच्या वतीने पर्यावरण दिन साजरा करण्याच्या सूचना सर्वच विभाग प्रमुखांना देण्यात आल्या होत्या. सूचनाचे पालन म्हणून काही कार्यलय प्रमुखानी रीतसर अमंलाबजावणी केली असली तरी बहुतांश विभागाने हा पर्यवरण दिनाचा कार्यक्रम केवळ बॅनर बाजीवरून उरकता घेतला आहे.त्यामुळे अशा पर्यावरण वादी प्रेमविरांच्या चर्चेला उधाण आले आहे. "झाडें,लावा झाडें जगवा" असा संदेश देणारे बॅनर अनेक ठिकाणी झळकले. त्या तुलनेत झाडें लावणारे हात दुर्मिळ ठिकाणी पाहायला मिळाले. ही दुर्मिळता का? या प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता वाढली आहे.

वृक्ष लावणे सोपे जगविणे कठीण 

शासनाने अशा कार्यक्रमावर मोठया खर्चाची तरतूत केली असती तर कदाचित हा कार्यक्रम प्रत्यक्ष राबविला गेला असता, असा काहीचा समज आहे.तर झाडें लावल्यानंतर जगवायचे कुणी असा प्रश्न अनेकांना भेडसावण्याची शक्यता आहे. झाडें लावणे सोपे असले तरी ते जगविणे अवघड काम आहे. आणि त्यामुळेच हा कार्यक्रम कदाचित होर्डिंगवरून उरकता घेतला जात असावा असा समज नागरिकांमधून व्यक्त होत असून,  पर्यावरण दिनाचा गाजावाजा केवळ प्रसिद्धी साठी होत तर नसेल ना अशीही शंका व्यक्त होत आहे. एकूणच ज्या उदिष्टासाठी हा पर्यवरण सोहळा आयोजित केला जातो ते उदिष्ट विभाग प्रमुखाच्या अशा कार्यप्रणाली मुळे साध्य होईल का? असा प्रश्न सर्वसामान्याना पडल्याशिवाय राहात नाही एवढे मात्र खरे.
होर्डिंगवरच्या वृक्षारोपणातून उदिष्ट साध्य होईल का? होर्डिंगवरच्या वृक्षारोपणातून उदिष्ट साध्य होईल का? Reviewed by सह्याद्री चौफेर on June 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.