सिंधी येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्यात आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना, पेंढरी येथील युवकाची आत्महत्यानंतर आणखीन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे च्या सुमारास सिंधी येथे घडली. 

विजय नानाजी खंडाळकर (40) रा. सिंधी (महागांव) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे. मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे मालिका कायम सुरूच असून अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, खते व कीटकनाशकांसाठी येणारा अतिरिक्त खर्च, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, मुलांचे शिक्षण इत्यादी कारणांमुळे या शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दिसून येत आहे.

सदर बाब घरच्या सदस्यांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ उपचारासाठी मारेगावला आणण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आणि खंडाळकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. 

विजय यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, त्याचे पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 



सिंधी येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या सिंधी येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on June 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.