सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : दोन इसम दुचाकीने करंजीकडे जात असतांना बोटोणी जवळ भरधाव वाहतूक करणाऱ्या एका ट्रक'च्या चाकात येवून एक जन ठार झाल्याची घटना आज सायंकाळी साडे सहा वाजता घडली. या धक्कादायक घटनेतील दुचाकी स्वाराने पोबारा केल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार मारेगाव वरून करंजीकडे जात असलेल्या मोटारसायकल वरील मागील व्यक्ती गतीरोधक वर उसळून मागून येणाऱ्या ट्रक (वाहन क्रं. MH.21 BH.7770) च्या चाकात आल्याने एक जन घटनास्थळी ठार झाला. ही धक्कादायक घटना आज बुधवारला सायंकाळी 6.30 वाजताचे दरम्यान, यवतमाळ मारेगाव हायवे रोडवरील बोटोणी गतिरोधक लगत घडली. मात्र, सोबत असलेल्या सहकारी दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पोबारा केल्याचे चर्चा आहे.
वृत्तलिहेपर्यंत मृतकाचे नाव कळू शकले नसून घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहे
ट्रक अपघातात एक जन ठार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 28, 2023
Rating:
