मारेगाव : जप्त बेवारस वाहनांचा होणार लिलाव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील पोलीस स्टेशन मारेगांव येथे बरेच दिवसापासुन बेवारस असलेल्या ठाण्यात बेवारस वाहने जप्त करण्यात आलेली होती. सदर गाडीचा लिलाव करणेबाबत विल्हेवाट परवानगी दिल्याने जप्त गाड्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मारेगाव पोलिसांनी दिली आहे.

पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या १५ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावणे प्रस्तावित आहे. त्याचे क्रमांक १) पॅशन एम. एस. ३२ यु १६६८, २) स्टार सिटी एम.एच.३२ ए.सी. ६६८२, ३) पॅशन हिरो हॉन्डा एम.एस. ३४ ए.एफ. ३८२३, ४ ) हिरो होन्डा एप्लेंडर एम.एच.३४ एन. ३७०४,  ५) हिरो स्प्लेंडर एम.एच. ३४ यु ५८६८, ६) कावासाकी एम.एच.२९ जे ४८६९, ७) टि.व्हि.एस. व्हिक्टर एम.एच. २९ एल ८४५५, ८) बजाज बॉक्सर एम. एच. २९ एच. ७४३८, ९) हिरो हॉन्डा पॅशन एम.एस. २९ पी ३८०८, १०) हिरो हॉन्डा पॅशन प्रोरो एम. एच. २९ डब्लु १०४९, ११) हिरो हॉन्डा सन्लेंडर एम. एच. २९ के २५, १२) हॉन्डा एक्टीव्हा एम.एच. ३१ सि.यु. २१७६, १३) सुजुकी चेसीज नं. १७०४७९६०२६, १४) अपाची चेसीज नं.एम डी ६३४ के ई ४, १५) बजाज चेतक स्कुटर असे एकुण १५ वाहनांचा समावेश असून पो.स्टे. बरेच दिवसापासुन बेवारस पडुन आहे.

या वाहनाचे मुळ मालक यांनी त्याचे वाहनाचे मुळ कागदत्रासह पो.स्टे. ला १५ दिवसाचे आत येवून आपली मालकी सिध्द करून वाहन घेवून जावे, अन्यथा नमुद वाहनाचा प्रस्तावित लिलाव शासकीय पध्दतीने करण्यात येईल असे ठाणेदार पुरी मारेगांव यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.



मारेगाव : जप्त बेवारस वाहनांचा होणार लिलाव मारेगाव : जप्त बेवारस वाहनांचा होणार लिलाव Reviewed by सह्याद्री चौफेर on June 28, 2023 Rating: 5
Powered by Blogger.