सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
शहरात उत्सव काळात शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला. आगामी बकरी ईद संबंधाने कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस स्टेशन मारेगांव शहर हद्दीतील मार्डी चौक, डॉ. आंबेडकर चौक, गौशिया मज्जिद व नगर पंचायत या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार व होमगार्ड रूटमार्च करीता आदिसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी रूट मार्च करून कोणत्याही परीस्थिला सामोरे जाण्यासाठी सज्ज असून कायदा व सुव्यवस्था चोख असल्याची ग्वाही त्यांनी या माध्यमातून दिली आहे.
मारेगाव मध्ये पोलिसांनी केले रूटमार्ट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 28, 2023
Rating:
