अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ
सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पुणे व पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इ. 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन 2023-24 ची इ. 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून प्रथम फेरीचे प्रवेश दिनांक 21 जून 2023 पासून सुरू करण्यात आले आहेत.
इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
बी.सी.झंवर/विसंअ/
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 28, 2023
Rating:
