टॉप बातम्या

कोरपना तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा : झाड कोसळून महिलेचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कोरपना : तालुक्याला शनिवारी दुपारी प्रचंड वादळी पावसाचा तडाखा बसला. दरम्यान वडगाव येथे झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला. 
वडगाव येथील शेतात कामाला गेलेल्या वैशाली गोवर्धन उरकुडे (वय 35) या महिलेवर झाड कोसळून जागीच मृत्यू झाला. गुलाब जिवतोडे यांच्या शेतात सरकी टिबायला सदर महिला गेली होती. काल दि.10 जून रोजी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे ती झाडाखाली थांबली तेव्हा झाड कोसळून तिचा मृत्यू झाला.
Previous Post Next Post