मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाने "ई-ऑफिस" प्रणालीच्या वापराबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : शासकीय कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण असून या प्रणालीच्या वापरामुळे कामकाज अधिक सुलभ व कागद विरहित होणार आहे. शासकीय कामकाजामध्ये ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले.

आज मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या वापराबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी सचिव श्री.भांगे बोलत होते.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव रवींद्र गोरवे, सहाय्यक संचालक कल्याण अवताडे उपस्थित होते.

श्री.भांगे म्हणाले, मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही प्रणाली कशा पद्धतीने राबविण्यात येते. तसेच ई- ऑफिस प्रणालीच्या तांत्रिक बाजू समजून घ्याव्यात व या प्रणालीचा वापर तात्काळ सुरू करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाने "ई-ऑफिस" प्रणालीच्या वापराबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाने "ई-ऑफिस" प्रणालीच्या वापराबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण Reviewed by सह्याद्री चौफेर on June 16, 2023 Rating: 5
Powered by Blogger.