वारंवार वीज खंडीत होणं ही रोजचीच कटकट...शासन, प्रशासन मुर्दाड; नागरिकांनी ओढले ताशेरे...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : लेखी निवेदन द्या, मोर्चा काढा, किंवा आंदोलन करा. काही उपयोग नाही, असे येतात किती अनं निवेदन देऊन जातात किती? असा समज तर महावितरणला नाही ना...? शुक्रवारी अचानक रात्रीचे 9.30 वा. लाईट गेली ती एकदम अंगाची लाहिलाही करूनच आली. जवळपास दिड तासाने लाईट आली. आणि घरात चिंब भिजून निघालेल्यानी सुटकेचा निःश्वास सोडला मात्र...पुन्हा 11.15 मिनिटांनी लाईट गेली... अनं चुभती जलती गर्मीचा पारा भडकला.

दोन दिवसापूर्वी केगांव मार्डी ए जी मधील ग्राहकांसह शेतकऱ्यांनी सज्जड दम निवेदनातून दिला, येत्या दिवसात या महावितरण च्या भोंगळ कारभाराविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले जाणार आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन मूग गिळून गप्प. अच्छे दिन करता करता कवडीची सुधारणा या महावितरण कंपनीच्या कामकाजात झाली नसल्याचे परिसरातील जनता कमालीचे कोरड्या मृग नक्षत्रात शेकून घेत आहे.

परिसरातील लाईनमन नागरिकांशी संवाद साधत नसल्याने आता माध्यमांचे फोन कॉल खणखणु लागले आहे. विद्युत सेवा ही चोवीस तास देणारी अत्यावश्यक सेवा आहे, असे म्हटलं जातं. मात्र ही सेवा गेल्या काही महिन्यापासून वारंवार वीज खंडीत होऊन जनतेचे दिवसरात्र हाल बेहाल करित असल्याच्या मौखिक तक्रारी आमच्या प्रतिनिधी कडे प्राप्त होत आहे.

मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की, आपल्याकडे पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला 'मृग लागले' असे म्हणतात, 'मृग नक्षत्र' हे आकाशमंडपातलं वैशिष्टयपूर्ण देखणं असं नक्षत्र मानलं जातं. युगानुयुगांपासून सामान्यत: 7 किंवा 8 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असे मानले जाते. आता हे मृग नक्षत्राचे चॅप्टर क्लोज होण्यासाठी उरलेत तीन ते चार दिवस, पाणी एक थेंब भर आला नाही, शेतकरी वाट पाहून थकले. 'ना पाऊस आला,नाही वादळ वारा'. मग या महावितरण कंपनी ला काय रोग आला की, गेल्या काही दिवसापासून मार्डी परिसरातील लाईट येरजाऱ्या करित आहे, हे काही कोड कळायला मार्ग नाही.

परिणामी घर सोडून किडाकिटकाचे बाहेरची नैसर्गिक हवा घेण्यासाठी घराबाहेर पडायची वेळ जनतेवर येत आहे..शिवाय अशा अंधाऱ्या वेळी भुरटे चोर. गावातील वस्तू असो की,शेतातील शेती उपयोगी साहित्य. चोरीला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. किंबहुना मच्छिन्द्रा शेत शिवारातील काही शेतकऱ्यांच्या मांडवातून (गोठा) शेतीची साहित्य मागील आठवड्यात लंपास झाल्याचे तक्रारी आहे. त्यामुळे शासन, प्रशासन मुर्दाड; नागरिकांनी ओढले ताशेरे...
वारंवार वीज खंडीत होणं ही रोजचीच कटकट...शासन, प्रशासन मुर्दाड; नागरिकांनी ओढले ताशेरे... वारंवार वीज खंडीत होणं ही रोजचीच कटकट...शासन, प्रशासन मुर्दाड; नागरिकांनी ओढले ताशेरे... Reviewed by सह्याद्री चौफेर on June 17, 2023 Rating: 5
Powered by Blogger.