सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : सर्व पक्षीय श्रद्धांजली सभा आज रविवारला १८ जुन 2023 ला आपल्या चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभाचे खासदार कर्तव्यदक्ष लोकाभिमुख व्यक्तिमत्व दिवंगत बाळुभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांना दुपारी १२.०० वाजता वणी - आर्णी लोकसभा मित्र परिवार व सर्व सामाजिक संघटना व हितचिंतक यांच्या माध्यमातुन सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या लोकनेत्याला श्रद्धांजली देण्याकरीता सर्व पक्षीय मित्र परीवार व सर्व सामाजिक संघटना, निमंत्रित आहेत, असे आवाहन करण्यात येत आहे. या श्रद्धांजली सभेचे वणी येथील शेतकरी मंदीर, येथे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजक स्व.बाळुभाऊ धानोरकर सामाजिक संघटना/सर्व राजकीय पक्ष/मित्र परिवार वणी विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने करण्यात येत आहे. तरी आपल्या लोकनेत्याला श्रद्धांजली वाहण्याकरिता सर्व पक्षीय तथा मित्र परिवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन मारेगाव काँग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी केले.