सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथील एका तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याचा बैल विजेचा धक्का लागून ठार झाल्याची घटना आज सायंकाळी साडे सहा वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार रानातून दिवस भर बैल चरून गोठ्यात परत आला, त्यानंतर नेहमी प्रमाणे पाणी पिण्यासाठी बैल गावालगत असलेल्या नाल्यामध्ये गेला, बैलाने पाणी पिले व तो घराच्या दिशेने परत निघाला, अशातच विजेचा तार रस्त्यात पडलेला असल्याने बैला चा त्या ताराला स्पर्श झाला आणि बैल जागीच ठार झाला. बैल घरी का? आला नाही म्हणून शेतकरी बबनराव लक्ष्मण काकडे (बैल मालक) हे नाल्याकडे गेले असता त्यांना बैल नाल्यात पडून दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर बैलाला विजेच्या खांबाचा तार अंगाला लटकेला आढळून आला, याबाबत त्यांनी प्रथम लाईनमन यांना माहिती दिली. ते घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच घटना स्थळी दाखल झाले. दरम्यान, बैल मृत्यूमुखी पडलेला दिसून आला. मात्र, या घटनेने महावितरण चा गलथाण कारभार चहाट्यावर आला आहे.
विजेचा धक्का लागून बैलाचा मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2023
Rating:
