सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : फासे पारधी समाजाचे लोकही माणसंच आहेत जनावर नाहीत, त्यांनाही माणसासारखे वागणूक द्या. फासे पारधी कुटुंबावर अन्याय करणारे वन अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून वन भूमीवर सन 2023 च्या खरीप हंगामात पेरणीकरिता अडथळा व त्रास देणाऱ्यांच्या निषेधार्थ वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निवास स्थानसमोर, चंद्रपूर येथे आक्रोश आंदोलन शुक्रवार दि.9 जून ला सकाळी 11. वा करण्यात येणार आहे.
फासे पारधी समाजाच्या भूमिहीन लोकांनी महसूल व वन भूमिवर शेतीसाठी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले असून त्यावर दरवर्षी जमिनीची मशागत करून जीवनाश्यक जिन्नसाची पेरणी केलेली आहे. परंतु सन 2023 च्या खरीप हंगामात पेरणीपूर्वी मशागत करणेकरिता फासे पारधी कुटुंब गेले असता वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात अडथळा व त्रास निर्माण होत असल्यामुळे फासे पारधी व वनकर्मचारी यांच्यात संघर्ष होऊ नये म्हणून संविधानात्मक मार्गाने बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीशकुमार इंगळे यांच्या नेतृत्वात 9 जून रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थाना समोर आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे.
या भव्य मोर्चात सहभागी होण्यासाठी यवतमाळ जिल्हाध्यक्ष विलास पवार व युवा प्रदेशाध्यक्ष प्रफुल इंगळे यांनी जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातील फासे पारधी समाजाचे पुरुष महिला व युवकांनी सक्रिय सहभाग दाखवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
या आक्रोश आंदोलनाचे नेतृत्व व प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय कार्याध्यक्ष, दलित पॅन्थर तथा प्रणेते बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे भाई जगदीशकुमार इंगळे हे करणार आहे. यासाठी यवतमाळ जिल्हाध्यक्ष, बिगर सातबारा संघटनेचे विलासभाऊ पवार व युवा प्रदेशाध्यक्ष प्रफुल इंगोलेयांच्या नेतृत्वात मारेगाव तहसीलदार यांना माहितीस्तव निवेदन देण्यात आले आहे. निवेदनकर्ते विलास पवार, प्रफुल इंगळे, मुरलीधर पवार, इंद्रसेन पवार, गुरुमूल पवार, राहुल पवार, प्रेमदास पवार, रुपेश पवार, शंकर भोसले, यांच्या सह्या आहेत.
बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने चंद्रपूर येथील वनमंत्र्याच्या निवास स्थानासमोर "आक्रोश आंदोलन"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2023
Rating:
