कासारबेहाळ येथील शंकर पटात सोपिनाथ महाराज साई प्रथमस्थानी

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : राज्यभऱ्यातील बंदी उठवल्यानंतर कासारबेहळ येथे पहिल्यांदाच गावगाडा शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या शंकर पटात मोठ्या संख्येने पटाचे हौसिंनी सहभाग घेतला होता. सदर शंकर पटाचे उदघाटन संदिप पाटील ठाकरे, रामहारी पाटिल आडकिने यांच्या हस्ते करण्यात आले. 

या शंकर पटामध्ये पहिले बक्षीस सोपिनाथ महाराज साई तर दुसरे बक्षीस बाबुसिंग राठोड तुळसी नगर यांनी पटकवले. तसेच तिसरे बक्षीस सुभाष राठोड टाकळी, चौथे बक्षिस संजय पावडे कासारबेहळ, पाचवे बक्षीस लक्ष्मी बाई वैद्य वडद, बंडु राठोड, सहावे बक्षीस रघुनाथ गोपने दहीवड, सातवे ओमकार धनवर ढाणकी, तर अरुण पिटलेवाड कासारबेहळ, आठवे बक्षीस चिंतामणी मस्के टाकळी, करन चव्हाण दहिवडी, यांनी पटकवले आहेत.

यात पहिले बक्षिस तिन हाजार रुपये नंदकुमार मस्के वरोडी सोसायटी आध्यक्ष यांच्या कडुन, दुसरे बक्षिस फरिद राठोड डिलर यांच्या तर्फे, शरद राठोड सरपंच, कैलास पिटलेवाड, संजय पावडे, गोलु कवाने, राधेशाम कवाने, विटल करे, दिलीप पिटलेवाड, बाळु करे, उत्तम मरकटे व संभाजी पावडे यांनी सहकार्य केले.
कासारबेहाळ येथील शंकर पटात सोपिनाथ महाराज साई प्रथमस्थानी कासारबेहाळ येथील शंकर पटात सोपिनाथ महाराज साई प्रथमस्थानी Reviewed by सह्याद्री चौफेर on June 07, 2023 Rating: 5
Powered by Blogger.