विठ्ठलवाडीला दूषित पाण्याचा पुरवठा, नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

सह्याद्री चौफेर | राजू डावे

वणी : शहरातील समस्या सोडवण्यात नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची ओरड विठ्ठलवाडी येथील रहिवाश्यांची आहे. तसेच दूषित पाणी पुरवठ्याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदनं सुद्धा दिली, मात्र काहीच उपयोग झाला नाही अशा स्थानिकांच्या तक्रारी समोर येत आहे.

गेल्या महिन्याभऱ्या पासून दूषित पाण्याचा पुरवठा येथील स्थानिकांना पुरवल्या जात असल्याची तक्रार असून 10 में पासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरु आहे तो आज रोजीही सुरूच आहेत असे "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना प्रदीप खंडाळकर (विठ्ठलवाडी) यांनी सांगितले आहे.

पुढे खंडाळकर सांगतात की, याबाबत अनेकदा ठेकेदार संभा वाघमारे यांना संपर्क साधल्या नंतर त्यांना त्यांचे 4-5 व्यक्ती पाहणी साठी पाठवले. दत्ता अपार्टमेंट व सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या, उघड्या प्लॉट वर सांडपाण्यामध्ये दोन लिकेज मिळाली ते लिकेज दुरुस्त केल्यानंतर ही पाण्याला खूप दुर्गंधी येत आहे तसेच पाण्याचा रंग ही फिका काळा आहे. ते दूषित पाणी वापरून आमचे आरोग्य बिघडत आहे. या नंतरही आमच्या आरोग्यावर परिणाम झाला तर सर्वसी जबाबदार नगरपरिषद राहील असा आरोप ही दिलेल्या निवेदनातून केला आहे.

खरं तर "जल ही जीवन" अस म्हटलं जात. मात्र, हेच जल मानवाला धोका, बाधक ठरत असेल तर निश्चितच याकडे प्रशासनाने प्रामाणिकपणे लक्ष दिलं पाहिजेत, गेल्या महिन्याभऱ्यापासून वणीकरांना दूषित पाणी पुरवठा मिळत आहेत. अनेक तक्रारी समोर येत असतांना लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी शहरातील समस्यांचे निराकरण केले पाहिजे. येथील नगरपरिषद प्रशासन अपयशी ठरत असल्याचे म्हणायची वेळ येऊ नये, किंबहुना आलीच असे नागीरकातून बोलल्या जात आहे.

परिणामी तातडीने हा दूषित पाण्याचा विषय मार्गी लावावा अशी स्थानिकांची मागणी असून ही समस्या समोर चालून उद्भवणार नाही अशी कायमची व्यवस्था सुद्धा करण्यात यावी, तूर्तास आरोग्य तर धोक्यात आलेच आहे, जीव गमावण्याची पाळी येऊ देवू नका...
विठ्ठलवाडीला दूषित पाण्याचा पुरवठा, नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष विठ्ठलवाडीला दूषित पाण्याचा पुरवठा, नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष Reviewed by सह्याद्री चौफेर on June 07, 2023 Rating: 5
Powered by Blogger.