आदिवासी गोंड गोवारींचे एकदिवसीय धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आदिवासी गोंड गोवारी जमातीला भारतीय संसदेच्या पहील्या अनुसुचित जमाती दुरुस्ती विधेयक १९५६ द्वारा अनुसुचित जमातीचे आरक्षण प्राप्त झाले.त्यापुर्वी १९५३ ला काकासाहेब कालेलकर कमिशनने गोवारी जमातीची शिफारस केंद्र सरकारला केली होती.त्यानुसारच गोंड या मुख्य जमाती अंतर्गत क्रमांक १८ वर गोंडाची उपजमात म्हणून गोंड गोवारी अशी नोंद आली.तेंव्हा पासुन ढाल वाघोबा नागोबा मोठा देव भिवसन या देवतांची उपासना करणाऱ्या गोवारीना गोंड गोवारी म्हणून आदिवासी चे आरक्षण प्राप्त आहे.

नुकत्याच १८डिसेंबर २०२० च्या ऐतिहासिक मा.सर्वोच्च न्यायालयाच्या ४०९६ /२०२० या निर्णयाने गोंड गोवारीच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब केले आहे.या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने १९६१ व १९७१ च्या जनगणनामध्ये गोंड गोवारी जमात यवतमाळ जिल्ह्यातील वणी,केळापुर ,यवतमाळ तालुक्यात चंद्रपुर जिल्ह्यातील सिरोंचा ,गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात मेळघाट तालुक्यात गोंड गोवारी जमात आली असुन १९६१ च्या इथनोग्राफीक नोट्स नुसार पान क्रमांक १९८ वर गोंड गोवारींची आडनावे नेहारे ,नागोसे,राऊत अशी आहे हे स्पष्ट नमुद केले आहे.
      
एवढा स्पष्ट निर्वाळा मा.सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार गोंड गोवारीचे जात प्रमाणपत्र प्रस्ताव फेटाळत आहे.सोबतच अनुसुचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळ गोंड गोवारीचे वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सुध्दा रद्दबातल करत आहे.ही कृती म्हणजे सदर अधिकारी व संस्थां यांचे कडून मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचा अवमान असुन संविधानाचे उल्लंघन आहे.त्यामुळे आदिवासी गोंड गोवारी जमातीवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध तथा आपला आक्रोश महाराष्ट्र शासनापर्यंत पोचविण्यासाठी दिनांक ५जून २०२३ रोजी आझाद मैदान यवतमाळ येथे एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित केले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व एल्गार संघटनेचे अध्यक्ष मनोहर शहारे ,आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीचे अध्यक्ष माधव कोहळे हे करणार आहेत.तरी हजारोच्या संख्येने वणी विधानसभा क्षेत्रातील मारेगाव ,झरी ,वणी तालुक्यातील हजारो गोंड गोवारी बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पुंडलिक फुन्ने,सुभाष लसंते,संजय चचाने,निलेश चौधरी,धनराज खंडरे,शञुघन ठाकरे,गजानन गाते,सतिश दुधकोहळे,पवन राऊत,पुरुषोत्तम राऊत,प्रदीप दुधकोहळे,अंकुश नेहारे,विलास नेहारे,सुधाकर राऊत,पवन खंडरे,शंकर खंडरे,दत्तू कोहळे,सुरेश दुधकोहळे,सुरेश नेहारे,चिंतामन वाघाडे,पंकज नेहारे,कैलास दुधकोहळे,लक्ष्मण वाघाडे,स्वप्नील नागोसे,सुनिल वाघाडे,कैलास वाघाडे ,प्रशांत लसंतेइत्यादींनी केले आहे.
आदिवासी गोंड गोवारींचे एकदिवसीय धरणे आंदोलन आदिवासी गोंड गोवारींचे एकदिवसीय धरणे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 04, 2023 Rating: 5
Powered by Blogger.