सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
सदर रॅली मध्ये वकील मंडळी, पोलीस बंधू, कर्मचारी वर्ग, पत्रकार व विधी स्वंयसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रारंभी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधिश निलेश प्रभाकर वासाडे यांनी सायकल चालविण्याचे महत्त्व पटवून सांगितले. ते दररोज ७ किलो मिटर सायकल चालवत असून सर्वांनी सायकल चालविण्याची आरोग्यदायी सवय आत्मसात करावी असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
यानंतर न्यायालय ते मांगरूळ (वणी मार्ग) पर्यंत जाऊन ही रॅली परत न्यायालयामध्ये येवून जागतिक सायकल दिन साजरा करण्यात आला.दरम्यान,रॅलीत जनजागृतीच्या घोषणा देण्यात आल्या. या रॅली मध्ये मारेगाव न्यायालयाचे न्यायाधिश निलेश प्रभाकर वासाडे, अॅड.मेहमूद पठाण, अॅड.करिश्मा किन्हेकार,अॅड. रुणाली गाणार, अॅड.मेघा कोडपे, अॅड.काजल शेख, कर्मचारी पांडुरंग वासाड, सूरज टेंभरे, प्रणय बूजाडे, जोतिबा पोटे, अशोक कोरडे, नागेश रायपुरे, विधी स्वंयसेवक विवेक बोबडे, राजू घुमे, पोलीस जमादार नितीन खांदवे, ताजणे, शंकर बारेकर, शिपाई पवन राऊत, मोसिम शेख, नंदू झोडे, मोरेश्वर कणकुंटवार, चेतन गेडाम यांनी सहभाग घेतला.
सायकल चालविण्याची आरोग्यदायी सवय आत्मसात करावी - न्यायाधिश निलेश वासाडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 03, 2023
Rating:
