अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी नारीशक्ती चा एल्गार

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील केसुर्ली येथे गेल्या दोन वर्षापासुन अवैध दारूविक्री सुरू आहे. यासाठी अनेकदा दारूची विक्री बंद करण्यासाठी गावातील महिलांनी विनंती केली परंतु याचा काही परिणाम न झाल्याने अखेर गावातील महिला व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन वणी पोलीस स्टेशनला २ जुन रोजी अवैध दारू विक्री बंद करण्याबाबतचे निवेदन दिले.

वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या केसूर्लीत अवैध दारू विक्री व्यवसाय गेल्या दोन वर्षांपासून जोमात सुरु आहे. या दारू विक्री मुळे महिला मंडळींना नाहक त्रास सहन करावा लगत असून अनेकांच्या संसारात कलह वाढले आहे. या अवैध दारूविक्री मुळे विद्यार्थ्यांवर सुद्धा वाईट परिणाम होण्याची शक्यता असून व्यसन जडण्याची दाट शक्यता महिला वर्गातून वर्तविली जात आहे. त्यामुळे येथील दारू विक्री करीत असण्याऱ्यावर कठोर कारवाई करा यासाठी महिलांनी एल्गार पुकारला असून वणी ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.

या दारू मुळे अनेक महिला त्रस्त झाल्या असून त्यांचा परिवार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे तात्काळ "अवैध दारूविक्री" बंद करण्यात यावी, अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा निवेदनातून वणी ठाणेदार यांना केसुर्ली गावातील महिला व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी दिला. यावेळी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते, तूर्तास दिलेल्या निवेदनावर संबंधित पोलीस प्रशासन काय ठोस पाऊल उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी नारीशक्ती चा एल्गार अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी नारीशक्ती चा एल्गार Reviewed by सह्याद्री चौफेर on June 04, 2023 Rating: 5
Powered by Blogger.