बेमुदत काम बंद धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : सोमवार, दि. ५/६/२०२३ पासून महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना, मारेगांव च्या वतीने सर्व पदाधिकारी व ग्राम रोजगार सेवकांचे बेमुदत काम बंद धरणे आंदोलन येथील पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. अशा आशयचे निवेदन पं स गटविकास अधिकारी, तहसीलदार व ठाणेदार यांना देण्यात आले. 

 प्रमुख मागण्या :

१) रोजगार सेवकाला सम्मानाची वागणुक देणे
२) मग्रा मनरेगा अंतर्गत कार्यारत असलेले ऑपरेटर यांचेकडे असलेला म.ग्रा.रोहयो योजनेचे टेबल श्री बादल खंडारे यांचेकडून काढण्याबाबत.
३) कामाची मागणी दिल्यानंतर त्वरीत मस्टर मिळत नसल्याबाबत.
 या प्रमुख मागण्यासह इतर ही मागणी केली जात आहे.
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच गावात विकास कामे झपाट्याने व्हावी यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागेल त्याला गावातच कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोजगार हमीची ऑनलाईन कामे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर ऑपरेट करण्यासाठी ऑपरेटर देण्यात आले असताना गेल्या काही दिवसापासून या योजनेला कंत्राटी पद्धतीचे ग्रहण लागले असून, रोजगार सेवकांच्या अमंलाबजावणीला या टेबलवर केराची टोपली दाखविल्या जात आहे. तसेच येथील ऑपरेटर कंत्रांटदाराच्या दावणीला बांधला गेला असल्यामुळे स्थानिक विकास कामात मोठा पेच निर्माण झाल्याची ओरड रोजगार सेवकातून होत आहे.

त्यामुळे रोजगार सेवकाना अपमानजनक वागणूक देणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या त्या टेबलवरून ऑपरेटर ला तात्काळ हटविण्यासाठी महाराष्ट्र रोजगार सेवक संघटना मारेगावच्या वतीने सोमवार 5 तारखे पासून काम बंद अंदोलनासह धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
बेमुदत काम बंद धरणे आंदोलन बेमुदत काम बंद धरणे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 04, 2023 Rating: 5
Powered by Blogger.