सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव ते मार्डी कडे जाण्यासाठी किन्हाळा येथील हा रस्ता महत्त्वाचा असल्याने; मारेगाव-मार्डी कडे जाण्यासाठी हजारो लोकांची या रस्त्यावरून दररोज वाहने जात असल्याने दोन महिन्या अगोदर या रस्त्यासाठी डांबरीकरण केले; परंतु रस्त्याचे काम होऊन दोन ते तीन महिने देखील उलटले नाहीत तोच या सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा (चिरा) गेल्या असून, या रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संबंधित ठेकेदाराचे पितळ उघडे पडले असून, या ठेकेदाराला आशीर्वाद कुणाचा अशी भावना वाहनधारक व्यक्त करीत आहे.
मारेगाव ते मार्डी या मार्गांवरील किन्हाळा दरम्यान झालेल्या डांबरी रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले. यात किन्हाळा 2 किलोमीटर मध्ये गावापासून काही अंतरा पर्यंत ठेकेदाराने केलेल्या कामाला जास्त ठिकाणी तडे गेले आहेत. 'आता संबंधित विभाग' या चिरा पडलेल्या ठिकाणे नवीन करणार का? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.
डांबरी रस्त्याला तीन महिन्यात भेगा; कंत्राटदारावर प्रश्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 04, 2023
Rating:
