सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ रोगे यांच्या नेतृत्वात मारेगाव येथील साई मंदीर येथे मराठी माणसाचा बुलंद आवाज तथा हिंदूजननायक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. या अनुषंगाने वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च टाळून मारेगाव पक्ष संघटनेच्या वतीने येथील साई मंदीर येथे निंब, करंजी, तसेच इत्यादी प्रजातीच्या वृक्षाचे रोपण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने समस्त मनसैनिकांनी राजसाहेब यांना उदंड आयुष्य लाभोत अशी ईश्वरास प्रार्थना करित शुभेच्छा दिल्या.
यावेळी संतोष रोगे, सुरज नागोसे, आदित्य बुचे, शेख नबी, अनंता जुमळे, गजानन चंदनखेडे, चांद बहादे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या सौ प्रतिभाताई तातेड, सौ. सिंधूताई बेसकर, नगरसेवक अंजु नबी शेख, सौ. संगीताई सोनुले, सौ बेबीताई आत्राम ईत्यादी सह तालुक्यातील समस्त मनसैनिक उपस्थित होते.
मनसैनिकांनी वृक्षारोपण करून केला राजसाहेब यांचा वाढदिवस साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 14, 2023
Rating:
