उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू: मारेगाव वणी राज्य महामार्गावर ट्रकने दिली होती जबर धडक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी- मारेगाव मार्गांवरील हायवे वर कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकने पायदळ जाणाऱ्या शेतकऱ्याला  धडक दिली. यात अपघातात ट्रक हा लेफ्ट चा राईट बाजूला जावून पलटी झाला. सदर अपघात मंगळवारला रात्री 9.30 वाजताचे दरम्यान, राज्यमहामार्गावर घडली. मात्र, अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा चंद्रपूर येथील रुग्णालय उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते.    
सुरेश विश्वनाथ पारखी (40) रा.मारेगाव असे ट्रक अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.ते मांगरुळ रस्त्यालगत असलेल्या शेतातून मारेगाव कडे आपल्या दिशेने पायदळ जात होते. अशातच मागावून कोळसा घेऊन येत असलेला वाहन क्रमांक MH 34 BJ 0046 ने सुरेश पारखी यांना जबर धडक देत ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाला. ट्रक चालक मद्द्य सेवन करून असल्याने त्याचे नियंत्रण सुटून अवजड असलेला ट्रक दिशाहीन होत  रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पलटला. अपघात होताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.
राज्य महामार्ग असलेल्या मारेगाव मांगरुळ रस्त्यालगत झालेल्या अपघातात सुरेश पारखी हे गंभीर जखमी झाले होते. मारेगाव वरून त्यांना चंद्रपूर येथे हलविले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा रात्री 12 वाजता मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी व दहा वर्षाचा मुलगा आहे.
उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू: मारेगाव वणी राज्य महामार्गावर ट्रकने दिली होती जबर धडक उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू: मारेगाव वणी राज्य महामार्गावर ट्रकने दिली होती जबर धडक Reviewed by सह्याद्री चौफेर on June 14, 2023 Rating: 5
Powered by Blogger.