सरपंचाना कामे करण्यासाठी हॉल उपलब्ध करून द्यावा- अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : गावाचा प्रमुखाला सरपंच म्हणतात. सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक. ह्या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मात्र असे असतांना या सरपंचाना बसण्यासाठी साधी जागा (हॉल) रूम तालुका स्तरावर नसणे किंबहुना त्यांना कामे करण्यासाठी बैठक नसणे हि बाब अतिशय खेदाची आहे. त्यामुळे आम्हाला हॉल (रूम) उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मडावी यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आले.

मारेगांव पं. स. अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रा. पं. सरपंच-उपसरपंच आपल्या ग्रामपंचायतीचे कामे करण्यासाठी मारेगाव पं. स. का येतात परंतू गावाच्या कारभाऱ्याला, सरपंच लोकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे खाली असलेले एक हॉल (रूम) देण्यात यावी तसेच सार्वजनिक शुद्ध पिण्याचे पाणी व्यवस्था करावी अशी आमची रास्त मागणी आहे. यावेळी अ भा स प तालुका अध्यक्ष तथा कृ ऊ बा स संचालक अविनाश लांबट, सरपंच तुळशीराम कुमरे, सरपंच दयानंद कुळमेथे, गोवर्धन तोडासे, रामचंद्र जवादे, गौतम दारुंडे (वंबआ ता. अध्यक्ष) आदींची उपस्थिती होती. 
सरपंचाना कामे करण्यासाठी हॉल उपलब्ध करून द्यावा- अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मागणी सरपंचाना कामे करण्यासाठी हॉल उपलब्ध करून द्यावा- अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on June 13, 2023 Rating: 5
Powered by Blogger.