वणीत जिनींगला आग, लाखांचे नुकसान…

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : येथील निळापूर ब्राम्हणी रोड वरील वैभव कोटेक्स जिनींगला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयाचे कापूस जळून खाक झाल्याची घटना 14 जून रोजी दुपारी 12 वाजे च्या दरम्यान, घडली आहे.

ब्राम्हणी रोड वरील वैभव कोटेक्स जिनींग मध्ये आज अचानक दुपारी आग लागली, यात अंदाजे 2 हजार क्विंटल कापूस जळाल्याचे अंदाज वर्तविला जात असून, जिनींग मधील कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान,आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. परंतु यात जिनींग मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
Previous Post Next Post