कुख्यात आरोपी गब्याला नागपूर येथून घेतलं ताब्यात...

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : पत्रकारावर सशस्त्र हल्ला करून फरार आरोपी "गब्या" हा वणी पोलीसांच्या हाती लागला असून त्याला नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. वणी परीसरातील कुख्यात चोरटा मो नावेद उर्फ गब्या मो कादीर रा. मोमीनपुरा (वणी) मा. सत्र न्यायालय पांढरकवडा (ता.केळापुर) यांनी शासकीय कर्मचा-यांवर हमला प्रकरणातील गुन्हयात व मा. प्रथम न्यायदंडाधिकारी वणी ज्यांनी विविध चोरीचे ०६ गुन्हयात शिक्षा सुनावली होती तेव्हापासून तो यवतमाळ कारागृहात बंदीस्त होता.

सजा भोगत असताना त्याने कोरोना काळात आजाराचे सोंग केल्याने त्यास उपचाराकरीता यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या दरम्यान, पोलीसांना चकमा देवुन तो पोलिस कस्टडी गार्ड येथुन मागील दिड वर्षापासून फरार होता. पोलीस त्याचा मागावर होते, किंबहुना त्याचा शोध घेत असतांना तो पोलीसांचे हातावर तुरी देत होता. त्याच दरम्यान दिनांक १२/१०/२०२२ रोजी फिर्यादी नामे मो. आसीफ मोहम्मद शरीफ शेख (वय ५६) पत्रकार रा. गाडगेबाबा चौक वणी यांच्या घरी जबरी चोरी करून त्यांना लोखंडी रॉड डोक्यात मारून जखमी करणारा आरोपी हा गब्या होता असा पोलीसांना संशय होता.

या प्रकरणी सूक्ष्म पद्धतीने तपास करून नमुद गुन्हयात संशयीत आरोपी "गब्या" याचा मागील ९ महिन्या
पासुन वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण यवतमाळ जिल्हयाचे पोलीस शोध घेत असतांना नमुद आरोपी बाबत दिनांक १० जून २३ रोजी डि.बी. पोलीस पथकांना गोपनीय माहिती मिळाली की, कुख्यात आरोपी हा कामठी (जि.नागपुर) येथे त्याचे भावाचे लग्नाकरीता येणार आहे,अशी खात्रीशिर माहिती असल्याने वरीष्ठांचे परवानगीने नमुद ठिकाणी सपोनि-माधव शिंदे पोहेकॉ- सुहास मंदावार, पोना-सचिन मरकाम, पोकों-विशाल गेडाम यांचे पथक पाठविले असता नमुद डि.बी पथकाने त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. वरील नमूद प्रकरणी आरोपीस कसून विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

सदरची कार्यवाही मा. डॉ. पवन बंसोड पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. गणेश किंद्रे उप.वि.पो.अ. वणी यांचे मार्गदर्शनात पोनि प्रदीप शिरस्कर ठाणेदार पोलीस स्टेशन वणी सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोहवा- सुहास मंदावार, पोना-सचिन मरकाम, पोकॉ-विशाल गेडाम यांनी केली. पुढील तपास पोउपनि-आशिष झिमटे हे करीत आहे.
कुख्यात आरोपी गब्याला नागपूर येथून घेतलं ताब्यात... कुख्यात आरोपी गब्याला नागपूर येथून घेतलं ताब्यात... Reviewed by सह्याद्री चौफेर on June 11, 2023 Rating: 5
Powered by Blogger.