सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : बेरोजगार युवक-युवती करिता मोफत संगणकाचे डीटीपी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर योजनेचा लाभ अनुसूचित जमाती प्रवर्गतील बेरोजगारांना घेता येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना स्टाइपन सुद्धा दिले जाणार आहे. हे विशेष..
मारेगाव तालुक्यातील आदिवासी समाजातील बेरोजगार युवक युवती करिता महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळातर्फे हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी बेरोजगारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याकरिता शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (TC), आधार कार्ड, मार्कशीट, बँक पासबुक, तीन फोटो अशी कागदपत्रे लागणार आहेत. 18 ते 45 वय वर्ष असणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील बेरोजगारांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी रुपेश हिरूरकर सह तालुका आयोजक कैलास दुधकोहळे यांनी केले आहे.
ज्या बेरोजगारांना या प्रशिक्षणात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 8806721133 या नंबर संपर्क करावा असे, आवाहन तालुका आयोजकाच्या वतीने करण्यात आले.
मारेगाव: बेरोजगारांकरिता संगणकाचे मोफत प्रशिक्षण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 11, 2023
Rating:
