बाजार समिती पाठोपाठ खरेदी विक्रीतही भाजपाची उसेंडी, 17 पैकी 14 जागा जिंकल्या

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शेतकरी खरेदी विक्री समितीची निवडणुक शुक्रवारी पार पडली. ही निवडणुक आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार व अॅड. देविदास काळे या यांचा नेतृत्वात शेतकरी एकता पॅनलने 17 पैकी 14 जागा जिंकले तर महाविकास आघाडीला 3 जागेवर 5, समाधान मानावे लागले.

प्रचारादरम्यान चुरशीची वाटणारी ही निवडणुक प्रत्यक्षात   एकतर्फी झाली. शेतकरी एकता पॅनलच्या विजयी उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना मोठ्या पराभवाची धुळ चारली. तसेच व त्यांचे स्वप्न एकता पॅनलने धुळीस  मिळविले.


मतदारांनी सत्ता परिवर्तनाचे विरोधकांचे मनसुबे उधळुन लावले असुन या खरेदी विक्री समितीच्या निवडणुकीत 7549 मतदारांपैकी 3224 मतदारांनी मतदान केले. यात शेतकरी एकताला कौल दिला आहे. यात 2 ईश्वर चिठ्ठौने भगवान मत्ते व सोनल बोर्डे हे विजयी झालेत. याच गटातील नेताजी मोरे, राजाभाऊ पाग्रडकर, अभय खाडे, ललीता भोंगळे, रेखा लाडे, विठठल पाचभाई, महादेव मत्ते, सुनिल वारकर, विठ्ठल कोडापे, विनोद कुचनकार, विलास मांडवकर, अशोक सुर हे सर्व भरघोस मतांनी विजयी झाले. त्यातही नेताजी मोरे यांनी सर्वांधिक मते घेण्याचा मान पटकाविला.
बाजार समिती पाठोपाठ खरेदी विक्रीतही भाजपाची उसेंडी, 17 पैकी 14 जागा जिंकल्या बाजार समिती पाठोपाठ खरेदी विक्रीतही भाजपाची उसेंडी, 17 पैकी 14 जागा जिंकल्या Reviewed by सह्याद्री चौफेर on June 11, 2023 Rating: 5
Powered by Blogger.