सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 वीचा निकाल केव्हा लागणार या बाबत पालकांबरोबरच विद्यार्थ्यांना सुद्धा प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून उद्या 2 जून 2023 रोजी 10 विचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2023 मध्ये घेतलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दि. 2 जून शुक्रवार रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची घोषणा राज्य मंडळाने केली असून पालक आणि विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
असा पाहा 10 वीचा निकाल SSC Result
■ सर्वप्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाइट -
■ नंतर महाराष्ट्र SSC निकाल २०२३ या लिंकवर जा.
■ त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव लिहा.
■ त्यानंतर लॉगिन करून तुमचा १०वीचा निकाल तपासा लक्षात ठेवा
■ निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट नंबर असणे आवश्यक असणार आहे.
■ त्यानंतर तुमचा रोल नंबर / सीट नंबर नीट टाईप करणे आवश्यक आहे.
■ तुमच्या आईचे नाव हे इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे.
■ त्यानंतर येणारं बेसिक बेरीज / वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.
आज 1 वाजता जाहीर होणार निकाल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 01, 2023
Rating:
