तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शहरालगत असलेल्या चिखलगावातील एका शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आपल्या जीवनाचा अंत केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पांडुरंग रामचंद्र सातपुते (48) असे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे. 31 मे. ला पहाटेच्या सुमारास त्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पांडुरंग यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, पांडुरंग याचे आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याचे अशा अकाली निधनाने घरातील कर्ताधर्ता परलोक गेल्याने सातपुते कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याचे पाठीमागे पत्नी,आई, व दोन मुले असा आप्त परिवार आहे. 
तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on June 01, 2023 Rating: 5
Powered by Blogger.