सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी इतर पिकाच्या लागवडी प्रमाणे आरोग्यदायी तृण धान्य उत्पन्नावर भर द्यावा असे आवाहन मारेगावचे कृषी अधिकारी सुनील निकाळजे यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2023-24 यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने घेतलेल्या विशेष मुलाखती मध्ये ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की दरवर्षी शेतकऱ्यांचा कल हा पौष्टिक तृणधान्य पिका ऐवजी कापूस पिका सह इतर पिका कडे दिसून येत आहे. या बाबीचा परिणाम राष्ट्रीय अन्न सुरक्षे सह मानवी समूहाच्या आरोग्यदायी जीवनावर झालेला आहे.त्यामुळे आपल्या आरोग्यदायी जीवनाच्या सरक्षणासाठी यंदाच्या सन 2023-24च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी तृणधान्य लागवडीवर भर दयावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा कडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियातर्गत पौष्टिक तृण धान्य पीकाच्या मिनी किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शंभर टक्के अनुदान तत्वावर देण्यात येणाऱ्या तृण धान्य वितरणा मध्ये ज्वारी, बाजरी, कुटकी, राजगिरा, कोधो, राळा इत्यादी कडधान्याचा समावेश असणार आहे.योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात सहभागी होऊन यशस्वी करावे, मागील हंगामात कापूस उत्पादना वर परिणाम झाला आहे. मार्केट मध्ये भावात झालेली घसरण पाहता यंदा 600हेक्टर कापूस पेरा कमी होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.45हजार 500हेक्टर एकून लागवडी खालील क्षेत्र आहे.
मागील वर्षी 32हजार हेक्टर क्षेत्र हे कापूस लागवडी खालील होते. यंदा 500-600 हेक्टर कापूस लागवड कमी होऊन सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढेल अशी शक्यता आहे. मात्र पौष्टिक तृणधान्य लागवडी कडे दरवर्षी शेतकरी दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे अन्न सुरक्षेच्या दृष्टीने गभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी आरोग्यदायी उत्पन्नावर भर देण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांनी आरोग्यदायी उत्पादनावर भर दयावा- सुनील निकाळजे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 01, 2023
Rating:
