टॉप बातम्या

तालुक्यात कडक्याच्या उन्हातही शेती मशागतीच्या कामांना वेग

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आगामी खरीप हंगामात पेरणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे करण्यावर भर दिल्याचे दिसुन येत आहे. तालुक्यात मागिल वर्षी प्रमाणे यंदाही कापसाची जास्त लागवड करण्यात येत असल्याचे खरीपाच्या नियोजनावरुन दिसुन येते.

गेल्या महिण्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाउस पडल्याने शेती मशागतीच्या कामास यावर्षी उशिर झाला आहे. जमीनीची धुप होण्याकरीता शेतकऱ्यांच्या वतीने शेतात नांगरणीचे काम सुरु आहे. यामध्ये पारंपारीक बैलगाडी पेक्षा ट्रॅक्टरव्दारे नांगरणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

मागिल वर्षी एका एकरचे नांगरणीचे दर 500 ते 600 रुपये होते. यावेळी मात्र, त्यात 200 रुपयांनी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. तालुक्यात मागिल वर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाला जोरदार फटका बसला होता. 



Previous Post Next Post