तो लढला अन् जिंकूनही आला; अनेकांनी केलं अविनाश लांबट यांचं तोंडभरुन कौतुक

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : वणी मतदार संघातील बाजार समितीचे निकाल समोर आल्यानंतर ठिकठिकाणी विजयी उमेदवारांनी जल्लोष केल्याचं दिसून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालात सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते म्हणजे मारेगाव तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटक संघाकडे. कारण या निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय सरपंच परिषद चे तालुका अध्यक्ष यांच्या राजकीय कौशल्य पणाला लागलं होतं. एकीकडे सर्वच जन अविनाश लांबट याच्याविरोधात गेले होते. पण या पठ्ठ्याने हार मानली नाही.

मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निकालानं अविनाश लांबट यांनी राजकारणात दमदार प्रवेश केला आहे. या निवडणुकीत भाजपा समर्थित शेतकरी परिवर्तन पॅनेलचे ते एकटेच विजयी झाले आहे. या निवडणुकीत शेतकरी एकता पॅनेलनं १७, तर शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या एका उमेदवाराचा म्हणजेच अविनाश लांबट हे एकमेव या निवडून आले आहे. या निवडणुकीत लागलेल्या निकालानंतर सर्वच स्तरातून अविनाश लांबट यांचे कौतुक होत आहे. तो लढला आणि जिंकूनही आला. ३५ वर्षाच्या तरुणाने आपले संस्कार जपत संयमाने विरोधकांशी लढाई जिंकून युवापिढीसमोर एक आदर्श घालून दिला आहे. जेव्हा रक्तातच जिंकण्याची धमक असते तेव्हा हरवण्यासाठी कितीही षडयंत्र रचले गेले तरी त्याला भेदून पार करणे आणि विरोधकांना आपल्या ताकदीचा परिचय करुन देणे आवश्यक असते. असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

तसेच एक संस्कारी व संयमी युवानेतृत्व अविनाश लांबट यांनी स्व. आईबाबांचे स्वप्न पूर्ण करत मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वर एकटा जिंकून आल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... अशा शब्दात अनेकांनी यावेळी यांचे कौतुक केले आहे.


आईंची आठवण मनात दाटून येतेय...

विजयानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढते, मारेगाव आणि परिसराच्या विकासासाठी तथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्का साठी आपण कटीबद्ध आहोत, असं अविनाश भाऊ लांबट यांनी विजयानंतर म्हटलं आहे. तसेच, सर्वच नागरिकांचे आभार मानत आज स्वर्गीय आईंची आठवण मनात दाटून येत आहे. आईनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल, असेही ते म्हणाले. अखिल भारतीय सरपंच परिषद चे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास दाखवला.

मारेगाव तालुक्यातील सुजाण नागरिक, कार्यकर्ते मित्र, सहकारी, पत्रकार, तालुक्यातील शेतकरी बांधव तथा हितचिंतक ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या निवडणूकीत मोलाची मदत केली त्या प्रत्येकांचा हा विजय आहे असंही अविनाश लांबट म्हणाले.
तो लढला अन् जिंकूनही आला; अनेकांनी केलं अविनाश लांबट यांचं तोंडभरुन कौतुक तो लढला अन् जिंकूनही आला; अनेकांनी केलं अविनाश लांबट यांचं तोंडभरुन कौतुक Reviewed by सह्याद्री चौफेर on May 01, 2023 Rating: 5
Powered by Blogger.