मानवी जीवनमान उंचवण्यासाठी व जीवन अधिक सुरक्षीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे - प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : दि.२६/४/२०२३ जीवनाच्या प्रवासात अनेक आपत्ती उद्भभवत असतात .काही नैसर्गिक तर काही कृत्रीम असतात.त्या आपत्तीला न घाबरता मानवी जीवन उंचवण्याची व जीवन अधिक सुरक्षीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांनी केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी समाजशास्त्र विभाग व रा.से.यो.विभागाच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. 7/04/2023 ते दि.24/04/2023 पर्यंत घेण्यात आला.यात विद्यार्थ्याना नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मितआपत्ती, मानसीक आपत्ती अशा विविधआपत्तीची ओळख या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली. आपत्ती आली असता आपत्ती ला कसे समोर जावे आणि त्यावेळी काय करावं या विषयावर मार्गदर्शन करणात आले तर ऑनलाईन च्या माध्यमातून NDRF चे इन्स्पेक्टर नीलेशजी जाधव, इन्स्पेक्टर ईश्वर जी मते यांनी विद्यार्थ्यांना फ्लड रेस्कु, सायक्लोन, भूकंप, आग लागली असता कसा बचाव करावा, अशा अनेक विषयांवर माहिती देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यानंतर श्रीमती साळुंका बाई राऊत कला वाणिज्य महाविद्यालय वानोजा येथील रसेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बापूराव डोंगरे यांनी अपघात ग्रस्त स्तीती मध्ये काय करावं कोणत्या प्रकारे विक्टिम ची काळजी घ्यावी या विषयावर सविस्तर माहिती दिली. श्रीमती साळुंका बाई राऊत कला वाणिज्य महाविद्यालय वणोजा तेथील रासेयों चा स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचा स्वयंसेवक आदित्य इंगोले ज्याने अनेक वन्यप्राण्यांना संकटात मदत करुन जीवनदान दिले, अपघात ग्रस्तांना मदत करुन त्यांचे जीव वाचविले अशा विद्यार्थ्याने आपत्ती व्यवस्थापन करीत असताना कोणत्या बाबीची काळजी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले कुणाचा जीव वाचविला की मिळणारा आनंद हा अनमोल असतो असा प्रेरणादायी संदेश त्याने विद्यार्थ्यांना दिला.
या एकदंर 18 दिवस चाललेल्या अभ्यास क्रमाचा समारोप आज मा.प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला .सुरवातीला समाजशास्त्र विभाग प्रमुख , रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समन्वयीका डॉ.निलीमा दवणे यांनी प्रास्ताविकेतून आपत्ती व्यवस्थापन हा अभ्यासक्रम सामाजीक जीवनात किती महत्वाचा आहे याबाबत सखोल माहीती दिली. प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे काय फायदा झाला या विषयांवर कु. अस्मिता वाळके, कू. वैष्णवी निखाडे, कू. अनुष्का नक्षीने आणि गौरव नायनवार यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन कू. संजीवनी भोयर आणि आभारप्रदर्शन कू. वैष्णवी निखाडे या विद्यार्थिनीनी केले सदर अभ्यास क्रमात कला, वाणिज्य, विज्ञान सर्व शाखेतील एकुण १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
मानवी जीवनमान उंचवण्यासाठी व जीवन अधिक सुरक्षीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे - प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 01, 2023
Rating:
