सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे
वरोरा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर तथा भद्रावती नगरपरिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील नारायण आत्माराम धानोरकर यांचे आज शनिवारी २७ मे रोजी सायंकाळी ५.३० नागपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
त्यांच्यावर नागपूर येथील अरिहंत हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
नारायण धानोरकर हे पेशाने शिक्षक होते. ते उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून भद्रावती येथील डिफेन्स जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यामागे दोन मुले खासदार बाळू धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुलगी सौ. अनिता बोबडे, स्नुषा आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह पत्नी वत्सला धानोरकर , नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
आज भद्रावती येथील घुटकाळा वार्डातील निवासस्थानी सायंकाळी ८ ते उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिवदेह ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या रविवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ९ वाजता भद्रावती येथील जैन मंदिर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
खासदार बाळू धानोरकर यांना पितृशोक; श्री नारायण आत्माराम धानोरकर यांचे दीर्घ आजाराने निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 27, 2023
Rating:
