सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
शहरातील एस.पी.एम. शाळेच्या मागील पटांगणात आज शनिवारी २७ मे रोजी ही कार्यवाही करण्यात आली. राहूल संजय डबडे (२१) रा.इंदिरा चौक, वणी. असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
एस.पी.एम. (SPM) शाळेच्या मागे खुल्या मैदानात एक तरुण हातात धारधार तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता, गुन्हे शाखेचे पोउनि योगेश रंधे हे पथकासह दाखल होऊन मैदानावरील पडीक विरान इमारतीमध्ये बसलेल्या तरूणाला ताब्यात घेऊन त्याचे जवळील धारदार तलवार जप्त केली. त्याचेवर शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास वणी पोलिस करीत आहे.
धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 27, 2023
Rating:
