युवकांनी "आपला दवाखाना" सुधारणे करीता तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिले निवेदन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : आरोग्य विभाग यवतमाळ द्वारा माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजने अंतर्गत नागरिकांकरिता आपला दवाखाना सुरू करण्यात आला. परंतु यात सुधारणा व्हवी याकरिता धिरज भोयर यांच्या नेतृत्वात तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले.

सदर योजना चांगली आहे यात दुमत नाही, परंतु आपण ज्या हेतूने तो दवाखाना सुरू केला कुठेतरी तो हेतू साध्य होत नसल्याचे आम्हा तरुण पिढीला दिसत आहे. दवाखाना प्रभाग क्रमांक १ मध्ये येत असून, दवाखाना हा नगरपरिषद शाळा क्रमांक पाच मध्ये आहे. या दवाखान्याबद्दल लोकांना योग्य माहितीच देण्यात आली नाही. दवाखान्याचा वेळाही माहित नाही, तिथे काय काय सुविधा मीळतात याची सुद्धा माहीती उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे आम्ही तिथे भेट दिली असता काही प्राथमिक गोष्टींची गरज आहे अस लक्षात आलं. तीथे technician आहे. मात्र, रक्त तपासणी बंद आहे, ANC महिला तपासणीसाठी आल्या तर वजन करायला वजन काटा उपलब्ध नाही. त्याच प्रमाणे शौचालय आहे पण पाणी व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नाही.

परिणामी या सुधारणा कराव्या जेणेकरून परिसरातील लोकांचा फायदा होईल.आमची आपणास विनंती आहे की वरील नमूद सर्व मुद्द्यांबाबत आपण एक पत्रक छापावे त्या पत्रकात वरील सर्व मुद्दे नमूद करावे आणि ते प्रभागात सर्वत्र वाटप करावे. यावेळी मुंगोली ग्रामपंचायत चे सरपंच मा. रुपेश ठाकरे, कोना ग्रामपंचायत सदस्य नितीन तुरांकर, शुभम लुटे, राहुल असुटकर,इत्यादी तरुण मंडळी उपस्थित होती.

आपला दवाखाना हा आपल्याच लोकांपर्यंत अजून पोहोचला नाही, त्यामुळे त्याचा प्रचार प्रसार चांगला व्हावा आणि तो लवकरात लवकर जनते पर्यंत पोहोचावा, जेणेकरून आपली जनता त्याचा पुरेपूर लाभ घेईल व तसेच या पद्धतीचे मोहल्ला क्लिनिक वणीतील प्रत्येक प्रभागात व्हावे अशी मागणी देखील आम्ही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शासन दरबारी केली आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील करत राहू. आम्हा तरुणांना जनतेवर पूर्ण विश्वास आहे की जनता नक्कीच शासनाला सहकार्य करतील व आपल्या दवाखान्याचा पुरेपूर लाभ घेतील.

-धिरज भोयर
 उपाध्यक्ष संकारदीप ब. उ. संस्था वणी
युवकांनी "आपला दवाखाना" सुधारणे करीता तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिले निवेदन युवकांनी "आपला दवाखाना" सुधारणे करीता तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिले निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on May 20, 2023 Rating: 5
Powered by Blogger.