सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : येथील प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरु असलेल्या कोसारा, बोटोनी चोरट्या कोल डेपोमधून महिण्याला 37 लाख 50 हजार रूपयाचा काळा बाजार होत असून तस्करा कडून मुजोरी वाढल्यामुळे परिसरात शांतता व सुव्यवस्था ऐरणी वर आली आहे.
मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोसारा येथील वर्धा नदी जवळ तसेच बोटोणी धाब्याजवळ कोळसा माफियानी कोळशाचा चोर बाजार भरवीला आहे. शासन मान्य कोळसा खाणीतून हा कोळसा क्षमते पेक्षा अधिक ट्रक मध्ये भरून कोळसा चोर बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. एका ट्रक मधून 500 किलो कोळशाची चोरी केली जात असून चोरून आणलेला 500 किलो कोळसा येथे खाली केल्या जात आहे. जमा झालेला कोळसा खाली ट्रक मध्ये लोड करून काळ्या बाजारात विकला जात आहे. चोर बाजारातुन खरेदी केलेल्या कोळशाची 3 रुपये प्रतिकिलो किमत असून खुल्या बाजारात या कोळशाला 8 ते 9 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. त्यामुळे हा व्यवसाय दोनही ठिकाणी मोठया प्रमाणात फोफावला आहे. दर दिवशी कोसारा येथील चोर बाजारात 15-20 ट्रक रोज खाली होत आहे, तर बोटोणीच्या चोरबाजारात 25 ते 30 ट्रक रोज खाली होत आहे. बोटोणी चोरबाजारात 15 हजार किलो कोळशाची तस्करी होत असून कोसारा चोर बाजारात 10 हजार किलोची एका दिवसातून तस्करी होत आहे. कोसारा पाईन्टवरून 50 हजार रुपये निव्वळ नफा तर,बोटोणी पाईन्टवरून 75 हजार रुपये दर दिवशी निव्वळ नफा या व्यवसायातून माफियाना मिळत असल्याची चर्चा आहे.चोरून आणलेल्या कोळशाच्या चोरट्या बाजारातून सव्वा लाख रुपये दर दिवशीचे उत्पन्न असून महिण्याला ही रक्कम 37 लाख 50 हजारावर पोहचत आहे.
चोरट्या व्यवसायातून मोठया प्रमाणात कमाई होत असल्यामुळे चोरटे सामान्य माणसा सोबत मुजोरी करीत आहे. वेळीच या चोर बाजाराला आवळ न घातल्यास परिसरात शांतता व सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे.
कोळशाच्या काळा बाजारात 38 लाखाची उलाढाल; मुजोरीमुळे शांतता व सुव्यवस्था ऐरणीवर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 20, 2023
Rating:
