सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : नुकत्याच जिल्ह्यातील जि प शाळेतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या यामध्ये मारेगाव तालुक्यातील सिंधी येथील दोन शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या शिक्षकांच्या बदल्या रद्द करा अन्यथा आमच्या पाल्याना शाळेतून काढू अशाप्रकारचे निवेदन पालकांनी दिले आहे.
तालुक्यातील सिंधी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 1 ते 7 वर्गाकरिता 55 विद्यार्थ्यांना तीन शिक्षक कार्यरत आहे. या शाळेतील नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बदलीत श्री. चिकाटे व काकडे मॅडम या दोन शिक्षकांची बदली झाली. यांच्या जागी शिक्षक न दिल्याने सात वर्गाला एकमेव शिक्षक कसा शिकविणार असा, सवाल पालक करीत आहे.
जि प शाळा सिंधी बदली झालेले दोन्ही शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रम असो वा विद्यार्थ्यांना शिकविण्यात चांगले कार्य करीत असताना या शिक्षकांची बदली आमच्या सिंधी शाळेचे मोठे नुकसान झाले आहे या शिक्षकांची बदली रद्द करण्यात यावी.-सविता गुंजेकरपालक जि प शाळा
विद्यार्थ्यात शाळेची ओढ निर्माण करून आनंददायी शिक्षण देणाऱ्या गौरव चिकाटे सर व काकडे मॅडम यांची बदली रद्द करावी.-रंजना राऊतपालक जि प शाळा
दोन शिक्षकांची बदली झाल्याने शाळेवर एकच शिक्षक कार्यरत आहे एक शिक्षक सात वर्गाना कसे काय शिकविणार बदली झालेल्या शिक्षकांची बदली व्हावी हीच आमची मागणी.-आश्विनी राऊतपालक
शिक्षकांची बदली रद्द करा...अन्यथा मुलांना शाळेत काढू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 20, 2023
Rating:
