सह्याद्री चौफेर | राजू डावे
मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे नुतनीकरण आणि मजबुतीकरण करण्याचे ध्येय असताना यासोबतच मोहदा सह परिसरातील गावांच्या सर्व समस्या लवकरच सोडविल्या जातील अशी ग्वाही आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी मोहदा दरम्यान अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत ९९.२४५ लक्ष तथा १० लक्ष निधी मंजूर झालेल्या रस्ता कामाच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पं स माजी सभापती श्री संजय पिंपळशेंडे, तर प्रमुख उपस्थिती श्री दिनकरराव पावडे, श्री गजाननराव विधाते, सौ. वर्षा रवींद्र राजुरकर (सरपंच) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री. सचिन ज्ञानेश्वर रासेकर (उपसरपंच), श्री, गणेश बोन्डे, ग्रा. पं सदस्य, श्री गजानन शेलवडे, ग्रा पं सदस्य, सौ. अर्चना गेडाम, ग्रा. पं सदस्या, सौं सीमा ढूमने, ग्रा पं सदस्या, सौं बेबीताई उईके, सदस्या, सौं शोभा टेकाम, सदस्या, सौं सुवर्णा बोन्डे सदस्या,आदीसह या कार्यक्रमाला समस्त गावकरी, मोहदावासी उपस्थित होते.
मोहदा येथे आमदारांच्या हस्ते विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 27, 2023
Rating:
